​‘सर्वांची पत सांभाळणारी आदर्श पतसंस्था म्हणजे कै.अशोकराव हाके पाटील पतसंस्था’: गणेश हाके

0
​‘सर्वांची पत सांभाळणारी आदर्श पतसंस्था म्हणजे कै.अशोकराव हाके पाटील पतसंस्था’: गणेश हाके

​अहमदपूर ( गोविंद काळे ) सहकारी पतसंस्था सर्वांची पत जपते आणि सांभाळते, तीच पतसंस्था उत्कृष्ट असते. याच दृष्टीने कै. अशोकराव हाके पाटील पतसंस्थेकडे पाहिले जाते, असे गौरवोद्गार गणेश हाके यांनी काढले. या पतसंस्थेमध्ये संचालक मंडळ बिनविरोध निवडून येतात, हे कौतुकास्पद असून याचे सर्व श्रेय सर्व सभासदांना जाते, असे ते म्हणाले.
​ते संस्कृती लॉन्स, अहमदपूर येथे आयोजित कै. अशोकराव हाके पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या १५ व्या सर्वसाधारण सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश हाके पाटील, अध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे, उपाध्यक्ष आशाताई रोडगे, सचिव संतोष मुळे, कोषाध्यक्ष परमेश्वर पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
​यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश हाके पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गेल्या पंधरा वर्षांत संस्थेची कामगिरी निश्चितच दैदिप्यमान झालेली आहे. आज संस्थेमार्फत सभासदांना कमाल १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले जाते, याचा त्यांना अभिमान आहे.
​संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे म्हणाल्या की, सभासदांनी आपले शेअर्स वाढवून प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंत करावेत, जेणेकरून संस्थेचे भागभांडवल दोन कोटींच्या वर जाईल आणि कर्ज वाटप अधिक सुलभ होईल. त्यांनी पतसंस्थेमध्ये सुरू करण्यात आलेल्या बचत ठेव योजनेचाही लाभ घेण्याचे आवाहन केले आणि २०२४-२५ या वर्षासाठी १२% लाभांश जाहीर केला.
​सभेचे प्रास्ताविक सचिव संतोष मुळे यांनी केले, ज्यात त्यांनी मागील वर्षाचा खर्च आणि पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. तसेच, विषयसूची वाचून दाखवली, ज्याला सर्वांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी गुणवंत पाल्यांचा आणि नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बचत ठेव योजनेत दोन लाख रुपये गुंतवल्याबद्दल श्रीमती बालिका चोरमले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दैवशाला शिंदे यांनी केले, तर आभार शेख जिलानी यांनी मानले. या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!