एकंबेकर महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न

0
एकंबेकर महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) येथील एकंबेकर महाविद्यालय शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वामी रामानंद तीर्थ,सर्वपल्ली राधाकृष्ण व बापूसाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.अशोक महाजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील, संस्थेचे कोषाध्यक्षा सौ.मृदुलाताई पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ‌. ओमप्रकाश क्षीरसागर हे उपस्थित होते. स्वागत गीत प्रा.सबनीस, कु प्रिती काळोजी, शौर्य मोरे यांनी सादर केले.
यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ओमप्रकाश क्षीरसागर यांनी केले. महाविद्यालयाच्या मागील पाच वर्षांपासूनचा शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक व क्रिडा उपक्रम प्रगतीचा आलेख व महाविद्यालयाचे व्हिजन व मिशन उपस्थित मान्यवरांसमोर मांडले. यानंतर पाहुण्यांचा परिचय प्रा.रेखा देशमुख यांनी केले. प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकवृंदानी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सविस्तर पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करावे. या देशाच्या विकासात शिक्षकांचा खूप मोठा सहभाग आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करावी असे सांगितले. संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना संस्थेची सुरुवात व आज पर्यंतची वाटचाल यावर प्रकाश टाकून सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षीय मनोगतात डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी व त्यांच्या जीवनाला एक दिशा देण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते, त्यासाठी शिक्षकांनी आजच्या काळातील आव्हाने याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करावे, असे सांगून सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.या विशेष पुरस्कार सोहळ्याबद्दल व आजच्या शिक्षण पद्धती बद्दल विचार व्यक्त केले, त्यात प्रा. नवनाथ खुळे, प्रा.शशिकांत जाधव, प्रा.दिलीप कांबळे, प्रा.संजयकुमार तोंडारे, प्रा.अनंत पाटील इत्यादींनी विचार मांडले.
मान्यवरांच्या हस्ते प्रा.राजू गुंडेराव सूर्यवंशी – विवेक वर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरोळ (जा), प्रा. कृष्णकांत बळवंतराव नेवळे – शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा उदगीर, प्रा. सौ. रचना शिवाजीराव गुड्डपे – शिवाजी जुनिअर कॉलेज हंडरगुळी, प्रा.शशिकांत शिवाजीराव जाधव – समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकुर्का रोड, प्रा.नवनाथ नामदेवराव खुळे – उद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावरगाव, प्रा. बालाजी नरसिंगराव हणमंते – माधवराव म्हाडीवाले उच्च माध्यमिक विद्यालय कोनाळी, प्रा. विठ्ठल मनोहर ठाकूर – लोणेश्वर कनिष्ठ विद्यालय लोणी, प्रा. संग्राम विठ्ठलराव घोगरे – श्यामलाल ज्युनियर कॉलेज उदगीर, प्रा. शेख शफी फरीदसाब – संत सावता माळी जुनिअर कॉलेज दावणगाव, प्रा दिलीप पांडुरंग कांबळे- गंगाधरराव साकोळकर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवर्जन, प्रा. संजय बाबुराव संगुळगे – पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय तोगरी, प्रा. संजयकुमार माधवराव तोंडारे -चंगळा माता उच्च माध्यमिक आश्रम शाळा जानापूर, प्रा. बालाजी लक्ष्मणराव बिरादार – गंगामाता जुनिअर कॉलेज लोहारा, प्रा. महेश रमेश हुलसुरे – श्याम आर्य कन्या कनिष्ठ महाविद्यालय, उदगीर. प्रा. अनंत कल्याणराव पाटील – छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर, प्रा. गोविंद रामचंद्र भालेराव – कै.धोंडीबा सुडे कनिष्ठ महाविद्यालय अवलकोंडा, प्रा. प्रभाकर मारोती तांबे- स्वामी दयानंद सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भाकसखेडा या सत्कारमूर्तींना सन्मानितकेले. त्याचबरोबर दूर शिक्षण विभागातून इतिहास या विषयातून शितल बिरादार या विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जोगन मोरे व डॉ. हिरा मोरतळे, आभार डॉ. विलास गाजरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध विद्यालय व महाविद्यालयातून शिक्षक वृंद , त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी झाली. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर ,सत्कारमूर्ती व विद्यार्थी यांच्यासाठी भोजनची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!