एम. ए. इंग्रजीमध्ये अपूर्वा नवले विद्यापीठात सर्वप्रथम; उदयगिरी महाविद्यालयाचा लौकिक वृद्धिंगत

0
एम. ए. इंग्रजीमध्ये अपूर्वा नवले विद्यापीठात सर्वप्रथम; उदयगिरी महाविद्यालयाचा लौकिक वृद्धिंगत

उदगीर (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2025 च्या परीक्षेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीरच्या एम. ए. इंग्रजी विभागातील अपूर्वा अरविंद नवले हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. मागील वर्षीही महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने विद्यापीठात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळविला होता. ही यशस्वी परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. इंग्रजी विभागाच्या सातत्यपूर्ण परिश्रम, सखोल मार्गदर्शन आणि चिंतन-मननाच्या त्रिसूत्रीमुळे विद्यार्थ्यांचा चढता आलेख निर्माण होत असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी काढले. अपूर्वा नवले हिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी तसेच प्रा. राजा मुदुडगे, डॉ. कमलाकर गव्हाणे, प्रा. प्रविण अंबेसंगे, डॉ. प्रसन्ने विजयालक्ष्मी, प्रा. रोडगे शिवनंदा, प्रा. बालाजीप्रसाद घाळे, प्रा. शादूल शेख यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!