अहमदपुरात लवकरच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणार – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

0
अहमदपुरात लवकरच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणार - सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

​अहमदपूर ( गोविंद काळे ) राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे लवकरच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार असल्याची घोषणा केली. शहरात ४ कोटी २० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे.

यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी अहमदपूर मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागतील. पाणीपुरवठा, नगरपालिकेसाठी सोलर योजना आणि शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, ही सर्व कामे लवकरच सुरू होतील.

पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, मतदारसंघाला ‘पाणीदार’ बनवण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. भविष्यात दोन नवीन कारखान्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा मानस असून, अंतेश्वर बंधाऱ्याला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. तसेच, तालुक्यात १०० कोटी रुपयांची पूल बांधकामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी मंजुषाताई लटपटे अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी संतोष लोमटे, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार, आणि इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष अमित रेड्डी यांनी केले, तर सूत्रसंचालन माधव माने आणि संभाजी चोपणे यांनी केले. आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!