महात्मा फुले महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त वृक्षारोपण
अहमदपूर,( गोविंद काळे )
येथील महात्मा फुले महाविद्यालयात हैदराबाद (मराठवाडा ) मुक्ती दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणा नंतर वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या शुभहस्ते मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय व विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रो.डॉ.दुर्गादास चौधरी, क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रो.डॉ. अनिल मुंढे, प्रो. डॉ. मारोती कसाब , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. सतीश ससाणे यांनी व आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
