सेवा पंधरवाडा अंतर्गत उदगीर किल्ला स्वच्छता मोहीम संपन्न

0
सेवा पंधरवाडा अंतर्गत उदगीर किल्ला स्वच्छता मोहीम संपन्न

उदगीर (एल पी उगीले)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्म दि.17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये ‘सेवा पंधरवाडा’ सहाय्यक संचालक पुरातत्व कार्यालय नांदेड विभाग व कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, श्री हावगीस्वामी महाविद्यालय, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, विद्यावर्धनी प्राथमिक शाळा, विद्यावर्धनी हायस्कूल व विद्यावर्धनी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उदगीर किल्ला स्वच्छता मोहीम’ हा उपक्रम आयोजित केला होता. या स्वच्छता मोहिमेमध्ये अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. या मोहिमेची सुरुवात कै. बापूसाहेब एकंबेकर सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.विजयकुमार पाटील यांनी करून शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर पुरातत्त्व विभागाचे डॉ. कामाजी डक, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.डॉ. सोमवंशी, डॉ. सावंत, प्रा. बंडे, डॉ.शिंदे, प्रा.चिखले, प्रा. कांबळे, प्रा.मुसने,प्रा. श्रीमती रेड्डी , विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयातून श्रीमती मृदुला पाटील , चिखले संदीप, शरद खोंडे ,विद्यावर्धिनी इंग्रजी माध्यमातून नगरे राजकुमार, महेश बाजुळगे, मुरली पिरंगवाड, सचिन भैया, डॉ. विजय विणकर, प्रा. रेखा देशमुख, डॉ.हिरा मोरतळे, प्रा. जोगन मोरे, डॉ.शिवानंद पाटील, डॉ. शिवाहार साळुंखे,डॉ.बालाजी महाळणकर, संजय मोरे, डॉ. सुरेखा दाडगे, दत्ता जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. किल्ला परिसरामध्ये प्लॅस्टिक गोळा करणे, गवत काढणे त्याचबरोबर गोळा केलेला कचरा किल्ल्याच्या बाहेर काढणे इत्यादी कामे प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली. कार्यक्रमानंतर फळे वाटप व दूध – बिस्किट यांची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!