उपजिल्हाधिकारी यांनी महसुल कर्मचाऱ्यासह पालावर केले दसरा सण साजरा
निलंगा (प्रतिनिधी) तालुक्यात अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कासार सिरसीसह परिसरातील पालावरील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. शासन, प्रशासन आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या पालावरील उपासमारीच्या संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत द्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले होते.
उपजिल्हाधिकारी निलंगा यांनी या विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन थेट पालावर जाऊन पालावर उपासमारीच्या संकटाला सामोरे जात असलेल्या कुटुंबाला जीवन उपयोगी वस्तूंची किट देऊन त्यांना एक मदतीचा हात पुढे केला आहे. दसऱ्या सणा निमित्त मदत करण्याचा योग व विशेष म्हणजे सुट्टी असतानाही या ठिकाणी त्यांना अन्नधान्यसह पालावरील कुटुंबाच्या अडचणी जाणून घेतल्या, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, अप्पर तहसीलदार शिवाजी कदम यांनी व्यक्तीश: सर्वांच्या भेटी घेऊन चर्चा केली व शासनाच्या वतीने योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले. या वेळी रेशन पुरवठा निरीक्षक अमोल पाटील,कासार बालकुंदा मंडळ अधिकारी एस.एस. स्वामी, कासार शिरसी मंडळ अधिकारी अनिल पुरी,तलाठी किरनसिंग गहीरवार, तलाठी किरन थोटे, तलाठी बालाजी जाधव, तलाठी सतीश लोहार, सुनिल मुंगळे तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी व कासार सिरसी उपसरपंच वीरेश चिंचनसुरे, जिलानी बागवान, बालाजी मिलगिरे, भास्कर पाटील, अंकुश परमेश्वरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
