छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन
उदगीर (एल पी उगिले) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयामध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सी. ए. मोहम्मद असफान चांदसाहब शेख आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता अर्थशास्त्र विभागाचे प्रो विकास सुकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षेत एम कॉम द्वितीय वर्षात विद्यापीठातून सर्वप्रथम व सर्वद्वितीय आलेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे कु. कारभारी प्रीती नागनाथ आणि कु. बिरादार श्रुती लक्ष्मणराव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सी. ए. मोहम्मद असफान चांदसाहब शेख यांनी विद्यार्थ्यांना सी.ए व इतर स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.तसेच प्रमुख पाहुणे प्रो. विकास सुकाळे यांनी आयातीवरील जकात या विषयी मार्गदर्शन केले. यानंतर प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे यांनी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानाबरोबरच नीतिमूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिंतलघट श्रुती यांनी, प्रास्ताविक प्रो. ह. वा कुलकर्णी यांनी,प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रो. डी. बी. कोनाळे यांनी तर
आभार प्रदर्शन प्रा.मयुरी चिवटे यांनी मानले.
कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. ह. वा कुलकर्णी, प्रो. डी. बी. कोनाळे, प्रा. जी.एम. बेद्रे, प्रा.एस.ए. खरात, प्रा आर. व्ही पवार, प्रा. अंजली पाटील व वाणिज्य विभागाचे शिक्षकेत्तर कर्मचारी सतीश बापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
