किलबिल नॅशनल स्कूलची मैथिली राठोड शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम
अहमदपूर ( गोविंद काळे): जिल्हा क्रीडा परिषद लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल, अहमदपूरची विद्यार्थिनी मैथिली दयानंद राठोड हिने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
मैथिली राठोड हिने १७ वर्षाखालील वयोगटात चमकदार कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे तिची विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मैथिलीला हे यश मिळवून देण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक कासीम शेख, मोसीन शेख, विशाल सरवदे, दत्तात्रय गिरी आणि नीलेश बन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे, ऑफिस इन्चार्ज सचिन जगताप, तसेच तिचे पालक दयानंद राठोड आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, मैथिलीला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
