विकासाला गती देण्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या : आ.संजय बनसोडे

0
विकासाला गती देण्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगिले) : राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्वाती सचिन हुडे व प्रभाग १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार साईनाथ माधवराव चिमेगावे, सौ.विद्या आनंद बुंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य संवाद रॅलीदरम्यान परिसरातील मतदार, नागरिक आणि तरुण मंडळींशी आ.संजय बनसोडे यांनी थेट संवाद साधला.यावेळी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी नागरिकांशी संवाद साधून युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
मागील आमदारकीच्या सहा वर्षात उदगीर शहराचा कायापालट केला असुन येत्या काळात उदगीरला स्मार्ट सिटी करण्यासाठी व उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी युतीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करुन उदगीरच्या विकासाला गती द्या असे सांगितले.
यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, बापूराव राठोड, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.स्वाती हुडे, सचिन हुडे, उत्तरा कलबुर्गे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, प्रा.श्याम डावळे, सुधीर भोसले, सुनिल सावळे, रामदास बेंबडे, मनोज पुदाले, अमोल अनकल्ले, अमोल निडवदे, आनंद बुंदे, उदय ठाकुर, शेषेराव सुडे, खिजर मोमीन, राजकुमार लिंबाळे, सरोज वारकरे, मंदाकिनी जिवणे, बबिता पांढरे आदी सह युती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!