श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन

मुरुम (प्रतिनिधी) : श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि., मुरुम या कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पुजनाचा व हायड्रोलिक ट्रिपलर बांधकामाचे भुमीपूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बसवराजजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला येत्या हंगामात कारखान्याचे ५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून सदर हंगामासाठी .लागणाऱ्या तोडणी वाहतूक यंत्रणेची भरती करण्यात आली आहे. तसेच मशिनरी ओव्हरहॉलींग, दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर चालु आहेत. अनेक अडथळयावर मात करत कारखान्याची यशस्वी वाटचाल चालु असुन येणारा गळीत हंगाम सुध्दा योग्य व नियोजनबध्द पध्दतीने सर्व मा. संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल अशी खात्री कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बसवराजजी पाटील साहेब यांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमास श्री. बापुरावजी पाटील साहेब माजी चेअरमन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, श्री. शरणजी पाटील साहेब, विरोधी पक्ष नेते जि. प. उस्मानाबाद, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकमियों काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन श्री. रामकृष्णपंत खरोसेकर, कारखान्याचे संचालक श्री. शरणप्पा पत्रिके, श्री. केशव पवार, श्री. विठ्ठलराव बदोले, श्री. विठ्ठलराव पाटील, श्री. दिलीप भालेराव, श्री. शिवलिंग माळी, श्री. माणिक राठोड, श्री. राजु हेबळे, श्री. सुभाष पाटील व सर्व संचालक मंडळ, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार व इतर मान्यवर, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.एम.बी. अथणी, चिफ इंजिनियर श्री ए. एल. अष्टेकर, चिफ केमीस्ट श्री एस.बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए.बी. राखेलकर, कार्यालय अधिक्षक श्री के.एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

About The Author