पतंजली योग प्रतिष्ठानच्या वतीने मासिक योग व्याख्यानमाला
उदगीर (एल पी उगीले) पतंजली योग प्रतिष्ठानच्या वतीने मासिक योग व्याख्यानमालेचे सातवे पुष्प डॉ.अर्चनाताई पाटील चांदेगावकर यांनी गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी , महाराष्ट्र पूर्व, सोशल मीडिया, अध्यक्ष मीनाक्षीताई स्वामी होत्या. याप्रसंगी डॉ .अर्चनाताई पाटील यांनी दैनंदिन जीवनातील प्राणायाम चे महत्व अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये उपस्थितापुढे केले. त्यानंतर उपस्थित योगसाधकां नी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अतिशय व्यवस्थितरीत्या सांगितले. अध्यक्षीय समारोप करत असताना मीनाक्षीताई स्वामी यांनी पतंजली योग प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. उदगीर मधील सर्व वर्गातील योग शिक्षकांचे व योगसाधकांचे आभार मानले. निशुल्क वर्ग चालवत असल्या बद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. योग साधकांच्या मनामध्ये निर्माण होणारी जिज्ञासा, त्याचे समाधान आणि योगसाधकांना योग साधना केल्यामुळे मिळत असलेल्या लाभ हा अतिशय अनमोल आहे. यावर त्यांनी भर दिला.या वेळी ज्येष्ठ योगसाधक बदनाळे वैजनाथराव यांचा नगरपरिषद उदगीर येथे त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल व त्यांच्या सेवा पूर्ती बद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीराम चामले यांनी केले. तर प्रास्ताविक नरेंद्र यंदे यांनी केले. तर प्रा डॉ नरेंद्र शिंदे यांनी उपस्थित श्रोत्यांचे व कुमार स्वामी प्रार्थना मंदिरातील सर्व सदस्यांचे आभार मानले. याप्रसंगी साधारणता 40 ते 42 योगसाधक उपस्थित होते. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
