आदर्श शिक्षिका सुंदाताई सरदार यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न

0
आदर्श शिक्षिका सुंदाताई सरदार यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगीले) येथील एक ज्येष्ठ लेखिका, समाज प्रबोधनात्मक लिखाण करणाऱ्या कवी मनाच्या आदर्श शिक्षिका, सुनंदाताई सरदार यांच्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी रमेश अण्णा अंबरखाने, प्राचार्य राजकुमार मस्के, धनंजय गूडसूरकर, शिवाजीराव साखरे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वनाथ मुडपे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी सुनंदाताई सरदार यांना सेवानिवृत्तीच्या निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच आता तुम्हाला समाजसेवा करायला आणि लेखन करायला भरपूर वेळ मिळेल. वेळेचा फायदा घ्या. आणि आनंदी राहा असे आवाहन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!