कोंम्बिंग ऑपरेशन दरम्यान बकरीसह चोर व एक पाहिजे आरोपी अटकेत

कोंम्बिंग ऑपरेशन दरम्यान बकरीसह चोर व एक पाहिजे आरोपी अटकेत

उस्मानाबाद (सागर वीर) : उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात चोरी, दरोडा असे मालासंबंधी व इतर गुन्हे केलेले अनेक आरोपी व गुन्हेगार उस्मानाबाद जिल्‌ह्यातील रहिवासी असुन यातील अनेक आरोपी हे उस्मानाबाद तसेच इतर जिल्हा, राज्यांस तपासकामी हवे असतांत. परंतु त्यांचा निश्चित ठावठिकाणा समजुन येत नसल्याने त्यांना पकडने जिकरीचे असते. अशा आरोपींसोबतच इतर संशयीत व्यक्तींचे इतीवृत्त (र्हिस्ट्रीशीट) पोलीस दलाने उघडलेले असुन या व्यक्तींचा सध्याचा व्यवसाय, वर्तनुक यावर पोलीस लक्ष देउन असल्याने वेळोवेळी त्यांना अचानक भेटून याची खात्री केली जाते.

या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनातून काल मंगळवार दि.10 ऑगस्ट रोजी 23.00 ते आज दि. 11 ऑगस्ट रोजी 05.00 वा. दरम्यान जिल्हाभरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. अशा संशयीतांची यादी स्थानिक गुन्हे शाखे मार्फत संबंधीत पोलीस ठाण्यांत पाठवण्यात आली. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांना नेमण्यात येउन आपापल्या हद्दीतील आरोपींची घरे, वस्त्या यांना अचानक भेटी देउन संबंधीत संशयीतांची खातरजमा करण्यात आली. हद्दीतील लॉजेस, धाबे, पेट्रोलियम विक्री केंद्रे, ए टी एम केंद्रांस अचानक भेटी देण्यात आल्या. या मोहिमे दरम्यान पोलीसांनी 30 हिस्ट्रीशीटर व्यक्तींना भेटून त्यांच्या सध्याच्या वर्तनाची शहानिशा करण्यात आली.

या कोबींग ऑपरेशन दरम्यान स्थागुशाच्या पोउपनि माने, पोना सय्यद, पोकॉ/ मारलापल्ले, होळकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सांजा ता.उस्मानाबाद येथील सचिन रामा काळे यास गोपनीय खबरेच्या आधारे ताब्यात घेतले असता ढोकी गुरनं 147/2021 मधील चोरीस गेलेली शेळी त्याच्या ताब्यात आढळली. पथकाने त्यास शेळीसह ताब्यात घेवुन ढोकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. तर अवैध गांजा बाळगल्या प्रकरणी कळंब पोठा गुरनं 187/2021 मधे पाहिजे असलेला आरोपी बालाजी छगन काळे यास मस्सा (खंडेश्वरी) येथुन कळंब पोठाच्या पथकाने कोबींग ऑपरेशन दरम्यान अटक केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!