जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे पालक मंत्री मा.ना शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण
उस्मानाबाद (सागर वीर) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.श्री.शंकरराव गडाख साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना पुष्पहार अर्पण करून नमन केले. याप्रसंगी मा.खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब- उस्मानाबादचे आ. कैलास घाडगे-पाटील, जि.प.अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त शासकीय कर्मचारी, पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, पत्रकार बंधू उपस्थित होते.