75 गरजू व गरीब महिलासाठी बेकिंग केकचा फ्री वर्कशॉप     

75 गरजू व गरीब महिलासाठी बेकिंग केकचा फ्री वर्कशॉप     

उदगीर (प्रतिनिधी) : 75 व्या स्वातंत्र्य दिना निमीत्त  IWC उदगीर तर्फे 75 गरजु व गरीब महिलांसाठी बेकिंग कोर्स केकचा फ़्री वर्कशॉप घेऊन, सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.75 महिलांसाठी वर्कशॉप ठेवण्यात आला होता, पण 90 नोंदणी होवून  उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांना तीन तासाच्या सेशनमधे  बेसिक टू ऐडवांस केक शिकवण्यात आले. तसेच उपस्थीत असलेल्या महिलांमधे लकी ड्रॉ द्वारे 5 बेसिक कीट (1200रु ) केकचे साहित्य  बक्षीस म्हणुन देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट मॅनेजर इन्नरव्हील क्लब च्या संपादक पल्लवी मुक्कावार होत्या. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सौ.मीरा चंबुले, सचिव शिल्पा बंड़े, उपाध्यक्ष स्वाती गुरूड, सहसचिव निलिमा पारसेवार, संपादक पल्लवी मुक्कावार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, आय एस ओ स्नेहा चणगे ,शकुंतला पाटिल, आशा घोनणशिकर, जैयश्री गुरमे , स्वाती जेठुरे, सीमा बाहेती, सुहासिनी  सुरशेटवार, अपेक्षा शेटकार, मीरा गुरूडे, पूजा गर्जे, वर्षा तिवारी, डॉ.सुप्रीया सोनटके यांचे सहकार्य लाभले.

About The Author

error: Content is protected !!