डाॅ.धिरज देशमुख यांची अंनिसच्या अध्यक्षपदी निवड
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार
अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारणी निवडीच्या कार्यक्रमाच्या सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार अध्यक्षस्थानी तर आगार प्रमुख शंकर सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. रविवारी ( ता.15) शासकीय विश्रामगृहात राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रकाश घादगीने, रमेश माने, वसंत टेंकाळे, निशिकांत मिरकले यांच्या उपस्थितीत नुतन कार्यकारीणी पदाधिकारी निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे.कार्याध्यक्ष – मेघराज गायकवाड, प्रधान सचिव – प्रा.रत्नाकर नळेगावकर, उपाध्यक्ष – चंद्रशेखर भालेराव, बुवाबाजी संघर्ष – दस्तगीर शेख, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प – प्रा.उमाकांत चलवदे, कायदेविषयक सल्लागार अॅड एन.एम देमगुंडे. वर्तापत्र व प्रकाशन विभाग – भागवत येणगे, सांस्कृतिक विभाग -अजहर बागवान. गोपाल पटेल, मानसिक आरोग्य विभाग – डाॅ जयप्रकाश केंद्रे, गणेश सुर्यवंशी, विविध उपक्रम विभाग – उद्धव इप्पर, गणेश कोदळे प्रशिक्षण विभाग – इम्रोज पटवेगर, रामराव केंद्रे सोशल मेडिया – शिवाजी गायकवाड, उदयकुमार गुंडीले, जात निर्मुलन व विवेकी जोडी विभाग – अभिनेता रूद्रा मुरकूटे, युवा व विवेक वाहिनी – संदिप गायकवाड,राहूल गायकवाड महिला विभाग डाॅ भाग्यश्री यलमटे, पुजा गायकवाड, शुभांगी खेडकर, सुरेखा उप्परवाड, अंजली वाघंबर, यास्मिन ताबोळी,वैशाली कदम तर मार्गदर्शक म्हणून डाॅ.चंद्रकांत उगीले, मोहीब कादरी , प्रा.गोविंद शेळके, डाॅ प्राचार्य वसंत बिरादार,प्रशांत घाटोळ महेंद्र खडागळे, यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून येथील माजी सैनिक अशोक लांडगे व विठ्ठल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.