परळी औष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता श्री मोहन आव्हाड साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न

परळी औष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता श्री मोहन आव्हाड साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.१५ ऑगस्ट रोजी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथे शक्तिकुंज मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्राचे मुख्य अभियंता माननीय श्री.मोहन आव्हाड साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी श्री.एच. के. अवचार साहेब उपमुख्य अभियंता (प्रशासन) श्री.एस.पी. राठोड साहेब ऊपमुख्य अभियंता (सं) आणि वैद्यकीय अधिकारी श्री राजेश गट्टुवार साहेब स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई चे डॉ. सुजित तुमोड,समाज सेवा अधिक्षक श्री.श.पारवे, ऊबेद मिर्झा, व त्यांची पूर्ण टीम ऊपस्थीत होती.या शिबिरात 52 जणांना रक्तदान केले आहे. सर्व प्रथम शक्तीकुंज मित्रमंडळ च्या वतीने मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुनील काळे साहेब यांनी केले पुढे रक्तदानाचे महत्व विशद करताना डॉ. सुजित तुमोड यांनी रक्तदानाचे फायदे आणि उपयोग यावर विस्तृत मार्गदर्शन केले यानंतर श्री राठोड साहेब यांनी नागपुरातील रक्तदानाची पार्श्वभूमी आणि उपक्रमाबद्दल प्रकाशझोत टाकला, या उपक्रमाबद्दल अवचार साहेब यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले, उद्घाटन पर मार्गदर्शन करताना मोहन आव्हाड साहेब यांनी रक्तदान शिबिर आयोजन हा एक स्तुत्य उपक्रम असून देश सेवेसाठी आपण रक्तदान करून दिलेले योगदान हे मोलाचे कार्य आहे आणि आपण या स्वातंत्र्यदिनी छान कार्यक्रम राबवला असे गौरवोद्गार काढले आणि मित्र मंडळाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री येवते साहेब यांनी केले. आणि या कार्यक्रमाचे संचलन श्री संदीप पाटील यांनी केले यांच्या नंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली याठिकाणी सर्वप्रथम केंद्राचे मुख्य अभियंता आव्हाड साहेब यांनी रक्तदान करून शिबिराला सुरुवात केली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित विविध संघटनांचे पदाधिकारी व सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला केंद्रातील कर्मचारी अधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे आयोजन इंजीनियर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री.शाहुराज येवते साहेब अति.कार्यकारी अभियंता सचिव सुनील काळे साहेब,कार्यकारी अभियंता, श्री.विशाल गिरे साहेब ऊप कार्यकारी अभियंता (प्रकल्प) व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सचिव श्री.संदीप पाटील व श्री.सचिन राऊत यांच्या प्रयत्नातून आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व मित्रमंडळी च्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पडले.

About The Author