महात्मा गांधी महाविद्यालयात डॉ.कॅ.अनिता शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा गांधी महाविद्यालयात नुकत्याच प्राचार्य पदावर विराजमान डॉ. कॅ. अनिता शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहन संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील महात्मा गांधी महाविद्यालयात, प्राचार्या डॉ. अनिता शिंदे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. किशनराव बेंडकुळे, सचिव अॅड. पी.डी. कदम, सहसचिव अॅड. वसंतरावजी फड, सदस्य सुरेशराव देशमुख, उद्धव देशमुख, मधुकरराव देशमुख, उपप्राचार्य बाभुळगावकर सर, अधिक्षक सुर्यवंशी यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी कोरोनावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे भित्तीपत्रक तयार करण्यासाठी मार्गदर्शक म्हणुन डॉ. अनिल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तर यावेळी वाय. आर. सुर्यवंशी. प्रा. नरवाडे सर, डॉ. आर. एम. जाधव, कला शाखेचे पर्यवेक्षक प्रा. ए. एन. शिंदे, पर्यवेक्षक जे. पी. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्राचार्या डॉ. कॅ. अनिता शिंदे म्हणाल्या कि, अहमदपूर पॅटर्न महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे परंतु माझ्या कारकिर्दित मी पुन्हा महाराष्ट्रात अहमदपुर पॅटर्न निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असुन पालकांना मी आवाहन करते की, लातुर, नांदेड, पुणे अशा शहरात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. आमचा सर्व स्टॉफ पुन्हा त्याच कार्यक्षमतेनी तत्पर झाला असुन आम्ही पुन्हा अहमदपुरला गतवैभव निर्माण करुन देण्यासाठी जिवापाढ प्रयत्न करणार आहोत. अहमदपूरच्या पॅटर्न निर्माण करण्यासाठी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव व पदाधिकारी यांनी प्रयत्न करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच मुलींच्या वसतीगृहाचीही सोय करण्यात आलेली आहे. तरी पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना महाविद्यालयात प्रवेश द्यावा असे आवाहनही प्राचार्या डॉ. कॅ. अनिता शिंदे यांनी यावेळी केले.