उजना गाव व हद्दीतील दारु बंद करण्यासाठी सर्वानुमते ठराव घ्यावा
दारुबंदीसाठी महिलांनी कंबर कसली, किनगाव पोलिसात तक्रार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथुन जवळच असलेल्या उजना गावातील व हद्दीतील दारु बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले असुन उजना येथील महिलांनी किनगाव पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत उजना या गावातील व गावच्या हद्दीतील दारु बंद करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट या दिवशी ग्राम सभेत ठराव घेवून त्याची प्रत मिळावी असे निवेदन सौ. सुरेखाताई बलभिम कासले, महिला माता बंधू भगीनी मंडळ उजना यांच्या वतीने करण्यात आले असुन मौजे उजना ग्रामपंचायत येथील महिलांनी उजना गांव व उजना ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दारु बंद करण्यासाठी दि. 2/8/2021 रोजी पोलिस स्टेशन किनगाव येथे तक्रारी अर्ज दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मौजे उजना गाव ग्राम पंचायतीतील व उजना ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी दारु बंद करण्यासाठी पोलिस स्टेशन किनगाव येथील वरिष्ट पोलिस अधिकारी यांना तक्रार अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाच्या अनुशंगाने निवेदन करते कि, येत्या 15 ऑगस्ट रोजींच्या होणार्या ग्राम सभेत मौजे उजना ग्राम पंचायतीच्या हद्दीतील दारु बंद करण्यासंबंधीचा ठराव घेवून तो मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर सौ. सुरेखाताई बलभिम कासले यांची स्वाक्षरी असुन या निवेदनाची प्रतिलिपी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय उजना व तंटा मुक्ति अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. पोलिस स्टेशन किनगाव येथे निवेदन देतेवेळेस भागाबाई आमृत परतवाघ, सिमींताबाई रावसाहेब परतवाघ, भारतबाई पांडुरंग परतवाघ, मुद्रिकाबाई जनार्धन परतवाघ, सुमित्रा दलित परतवाघ, चंद्रकला बेलाजी वाघमारे, मुद्रिकाबाई कोंडीबा परतवाघ, अनिता प्रल्हाद परतवाघ, अनिता प्रल्हाद परतवाघ, रशिका बबन परतवाघ, अनिता देविचंद्र परतवाघ, शिवनंदा श्रावण सोनवणे यासह 327 महिलांनी निवेदनावर स्वाक्षर्या केल्या आहेत.