डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी अति जोखिम अवस्थेतील मातेेची केली यशस्वी प्रसुती

डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी अति जोखिम अवस्थेतील मातेेची केली यशस्वी प्रसुती

अहमदपूर (गोविंद काळे) : येथुन जवळच असलेल्या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी अति जोखिाम अवस्थेतील मातेची यशस्वी प्रस्ाुती केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या किनगाव येथील रहिवाशी शेख शबाना हुसेन या मातेची डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी यशस्वी प्रसुती केली आहे. प्रसुतीसाठी आलेल्या शेख शबाना या मातेची सोनोग्राफी केली असता पोटामध्ये बाळाचे आतडी बाहेर आहेत असा रिपोर्ट आला होता. मातेच्या पोटामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित झाली नव्हती. अश्या जोखिमेच्या प्रसुतीची जिम्मेदारी डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी घेतली आणि यशस्वीरित्या नॉर्मल पद्धतीने प्रसुती करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
यावेळी मातेचे सासरे शेख इस्माईल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, जेंव्हा नवव्या महिण्यामध्ये आम्ही मातेची सोनोग्राफी केली होती तेंव्हा मातेच्या पोटामध्येच बाळाचे आतडी बाहेर आल्याचे आम्हाला समजले होते तसेच बाळ मातेच्या पोटामध्ये व्यवस्थित वाढले नाही. डीलिव्हरी नॉर्मल होने अवघड आहे. तसेच बाळ आईच्या पोटामध्ये कदाचित मृत आहे याची आम्हाला माहिती होती पंरतु आमची खुप गरीबी परिस्थीती असल्या कारणाने आम्ही लातुर किंवा मोठ्या शहरात जावू शकत नव्हतो. बाळाची जगण्याची शाश्‍वती नव्हती परंतु मातेला वाचवण्यासाठी आमचा अठ्ठाहास होता. जर मोठ्या शहरात आम्ही गेलो असतो तर आम्हाला एक लाखाच्या जवळ जवळ खर्च आला असता. मातेचे सिझर केल्याशिवाय पर्याय नाही अशी भिती आम्हाला काहीजणांकुड घालण्यात आली होती. मात्र डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी आम्हाला धिर दिला आणि यशस्वी रित्या नॉर्मल प्रसुती करुन मातेचा जीव वाचविला. देवाच्या रुपात आम्हाला डॉ. सांगवीकर साहेब भेटले असेही शेख ईस्माईल यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले. यशस्वी प्रसुती करण्यासाठी रेखा भालेराव, आशा ढाकणे, सुवर्णा लटपटे, श्रीमती अनुसया कांबळे, तीर्थंकर श्रीकांत यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!