लातुर येथील राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेला आ.बाबासाहेबजी पाटील यांची उपस्थिती
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद दि १६ ऑगस्ट रोजी पार पडली. या परिषदेला कृषीमंत्री मा. दादाजी भुसे यांची उदघाटक म्हणून उपस्थिती लाभली होती. यावेळी अहमदपूर चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती सदरील परिषदेत शेती विषयक महत्वाचे विषय आणि समस्यांवर चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिषदेला राज्यमंत्री संजय बनसोडे, खा.ओमराजे निंबाळकर, ज्ञानराज चौघुले, धीरज कुमार साहेब, एकनाथ डवले, विकास पाटील, साहेबराव दिवेकर, डॉ.अशोक ढवन, दशरथ तांबाडे, दीपक तावरे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, जि. प. सीईओ अभिनव गोयल, निता खंडिल, शिवाजीराव माने, सुनिताताई चाकण, डी.एस. गवसाने, आर. एस कदम, तीर्थकर आदींची उपस्थिती होती.