अहमदपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – आमदार सुरेश धस
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरातील विकास कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही त्यासाठी विविध योजनांचे प्रस्ताव सादर करा विकास निधी कमी पडू देणार नाही असी ग्वाही लातूर, उस्मानाबाद, बीड या तीन जिल्ह्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी दिली. आ. सुरेश धस हे विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अहमदपूर येथे आले असता अमित रेड्डी यांच्या निवासस्थानी आ.सुरेश धस यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी आ. सुरेश धस बोलत होते. यावेळी माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केन्द्रे, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा चे माजी जिल्हा अध्यक्ष अमित रेड्डी, गोविंद गिरी, रामभाऊ बेल्लाळे, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, गटनेते राहुल शिवपुजे, हणमंत देवकते, गोविंद बैकरे,अॅड.निखिल कासनाळे, जगन्नाथ मामडगे, श्रीकांत उपाध्याय, अतुल रेड्डी, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.