साचलेल्या पाण्यात जहाज (नाव) सोडून युवकांची गांधी गिरी

साचलेल्या पाण्यात जहाज (नाव) सोडून युवकांची गांधी गिरी

किनगाव (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील मुख्य रस्त्यात खड्डे पडले होते. त्यामुळे पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण होत होता.त्याचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे संताप व्यक्त करत युवकांनी या साचलेल्या पाण्यात प्रतिकात्मक नाव सोडून गांधी गिरी मार्गने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. येथील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते व सध्या पावसाळा असल्याने त्या खड्यात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते त्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत होता.याची दखल घेउन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्डयात नाव सोडून गांधी गिरी मार्गाने आदोलन करताच संबंधित अधिकाऱ्यांना जाग आली व लागलीच मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजऊन मुख्य रास्ता दुरुस्त केला. त्या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कामास सुरुवात करून गावकऱ्यांची अडचणी दूर केली. यावेळी गणेश पांचाळ शिवसेना तालुका उपप्रमुख रतन सौदागर,जाकेर कुरेशी, राजीव मोहगावकर, पंडीत अण्णा बोडके, धनराज बोडके,त्रिशरण वाघमारे आदीजन उपस्थित होते.

About The Author