गाव तिथे शाखा स्थापन करणार – भाजपा नेते दिलीपराव देशमुख

गाव तिथे शाखा स्थापन करणार - भाजपा नेते दिलीपराव देशमुख

अहमदपूर (गोविंद काळे) : भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक यांची जळकोट येथे बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाचे कार्यालय जळकोट येथे तालुक्यातील भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, “गाव तिथे शाखा” ही मोहीम कार्यकर्त्यांनी हाती घ्यावी. व भाजपा किसान मोर्चा तर्फे आढावा बैठक घेण्यात आली.

काँग्रेसने सर्वसामान्य जनतेचा वापर केवळ सत्ता भोगण्यासाठीच केला आहे. तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात लढण्याची हिंमत करावी. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भाजपाकडून जनतेच्या अपेक्षा असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी ‘गाव तिथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता ही मोहीम कार्यकर्त्यांनी ताकदीने हाती घ्यावी. असे आवाहन करण्यात आले.

बैठकीप्रसंगी, तालुक्यातील सर्व गावात किसान मोर्चाची शाखा स्थापन करण्याचे आव्हान किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलतांना सांगितले. किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामराव ऎकलारे, अहमदपूर चे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोरे, अँड.सुधाकर जगताप, बालाजी तिडके, बालाजी केंद्रे, शिवाजी डुकरे, बालाजी मालुसरे, रत्नाकर गुट्टे, बालाजी सिंदगीकर, भाऊराव कांबळे,जगन्नाथ मैलारी, दत्ता वंजे, निलेश गडकर, रामकिसन पवार, दयानंद रेड्डी,अजीत गुट्टे,रमेश चोले,बाबूराव गुट्टे,अरुण केंद्रे, उत्तमराव जाधव, आदिसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!