अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ गरजू महिला व ७५ विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्प – सौ.आयोध्याताई केंद्रे

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ गरजू महिला व ७५ विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्प - सौ.आयोध्याताई केंद्रे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री.साई गणेश मिलिट्री फाउंडेशन आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक लातूर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा मा.सभापती अशोकरावजी केंद्रे, मिलट्री कॅम्पचे अध्यक्ष अनिरुद्धजी केंद्रे व माझ्या सर्व कुटुंबीयांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 गरजू महिलांना साडीचोळी वाटप करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील 75 गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्धार करून त्यांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा मानस आम्ही केंद्रे कुटुंबीयांनी केलेला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री.साई गणेश मिलट्री फाउंडेशनच्या परिसरामध्ये 75 सर्व रंगाच्या ध्वजाची उभारणी करण्यात आली असून 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५० वृक्षांची लागवड या दिवशी केली आहे. तालुक्यातच नव्हे तर सबंध जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवड चळवळ उभी करून त्या हजारो वृक्षांचे संगोपन करण्याचे काम मागच्या पंधरा वर्षापासून माझे पती मा.अशोकरावजी केंद्रे करत आहेत. मागील महिन्यामध्ये झालेल्या माझ्या ५२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये ५२००० वृक्षांची लागवड करण्याचा आम्ही संकल्प केला आहे अशी माहीती आयोध्या केंद्रे यांनी दिली आहे.

About The Author