सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे दहीहंडी सजावट स्पर्धा संपन्न

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल येथे दहीहंडी सजावट स्पर्धा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी सजवण्याच्या स्पर्धाचे आयोजन सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा ता. अहमदपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मा गणेश हाके याचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सामाजिक रूढी परंपरा जपताना कोरोना चे नियम पळुन आशा प्रकारे विध्यार्थी यांच्या अंगी असलेले सुप्त गुणांना वाव मिळूऊन देण्याचे काम केले असे गौरवोद्गार गणेश हाके यांनी काढले. ‘दहीहंडी सजावट स्पर्धेचे’ आयोजन पुढील गटात करण्यात आले होते ‘अ’ गट 1 ली ते 4 थी, ‘ब’ गट 5 वी ते 7 वी ‘क’ गट 8 वी ते पुढील सर्व ,

यामध्ये अ’गट प्रथम सोहम लक्ष्मण फुलारी, दुतिय पार्थ/पूर्वी प्रमोद दिक्कनवार, तृतीय माने किमिया किशोर ‘क’ गट प्रथम संध्या भरत सुरणर, द्वितीय वैष्णवी संतोष देवकते, तृतीय क्षितिजा अनिल हमने, शेजल सोपान राठोड, दिपाली दत्ता पिंगळे, वैष्णवी येलबा लिंगनवाड सदरील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा संस्था अध्यक्ष गणेश हाके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालिका शिवालीका हाके, प्राचार्य रूत चक्रनारायण, दीपक बिरादार, एम निजामुद्दीन, शुभांगी सूर्यवंशी, प्रणिता राठोड, भारत कानवटे, श्रीमती विद्या शिंदे, चंदा कडवादे, केशव तोंडारे, नरवटे, उदगिरे, कैलास होनमाणे,संग्राम सुरणर,उमेश फुलारी, संतोष होनमाणे, चव्हाण मंगेश, सतीश केंद्रे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धू मासुळे यांनी तर आभार संचालक कुलदीप हाके यांनी मांडले.

About The Author

error: Content is protected !!