अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींची पदवी परीक्षेत गरुड झेप…!
पूजा चव्हाण महाविद्यालयात सर्वप्रथम, तर सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण … त्यात ४० मुलींनी गुणवत्तेत बाजी मारली…!
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने घेतलेल्या उन्हाळी २०२१ बी. ए.पदवी परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवून, यावर्षीही गुणवत्तेची गरुड झेप घेतली आहे. महाविद्यालयातून कु. पूजा चव्हाण या विद्यार्थीनी ने प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर गुणवत्तेत ४० मुलींनी बाजी मारली आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयाचे एकूण सर्वच म्हणजे ४० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून, महाविद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. बी. ए. पदवी अंतिम परीक्षेत कु. पूजा गोपीचंद चव्हाण ही विद्यार्थीनी ९०.४० टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून सर्व प्रथम आली असून, कु. मिसबा अलिमोद्दीन शेख ही विद्यार्थीनी ८९.३७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून द्वितीय आली आहे, तर कु. रेणुका पुंडलिक मलकापूरे ही विद्यार्थीनी ८९.०३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून तृतीय आली आहे.
यांच्यासह ४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये नरवटे गणेश मोहन (८८.२९) कु. गवळे निकिता (८७.९७)कु. मकापल्ले राणी ,(८७.५४) कु. सोनकांबळे प्रियंका (८७.४३), हौसे योगेश (८५.६९) , कु. भदाडे मंजुषा(८५.२३), कु. कांबळे पूजा ( ८५.२३), भालेराव निखिल (८३.९१), कु. कांबळे निकिता (८३.९१), कु.टोकलवाड शुभांगी (८३.८३), कु.सुरनर जया (८३.७७), कु. गायकवाड रमाताई (८३.६९), तेलंगे संतोष (८३.५४), कु. देमगुंडे कुसुम (८३.५४), मेकाले हणमंत (८३), रोडे नीलेश (८२.८३), कु. वाघमारे भाग्यश्री (८२.८), राठोड कृष्णा (८२.६), कु. देशमुख पूजा (८२.५१), कु. भुतके वैष्णवी (८२.२३), सोळंके संभाजी (८२.०३), कु. सुरनर प्रतिभा (८१. ९४), नायने गोविंद (८१. ९१), कराड प्रवीण (८१.५७) कु. लिंबले कविता(८१.०३), लामतुरे वैभव (८०.७४), कु. सकनुरे प्रियंका (८०.६३), वाघमारे अमोल (८०.५१), बनसोडे आस्मिता ( ८०.४३), कु. सावंत निकिता (८०.४३), शिंदे अजीत (७९.९७), कु. पिलवटे योगेश्री (७९.९४), शिंदे कुणाल (७९.७७), सुरनर पवन (७९.७१), कांबळे सुजाता (७८.८९), गायकवाड तेजस्विनी (७६.४२) आदींचा समावेश आहे.
बी. ए. तृतीय वर्षाच्या एकूण ४४विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी विशेष प्राविण्यात ४० उत्तीर्ण झाले आहेत.व उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत आलेले आहेत. महाविद्याल याचा एकूण शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव चामले सचिव ज्ञानदेव झोडगे यांच्यासह उदगीरचे सर्व पदाधिका-यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व उपप्राचार्य, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केले.