शहरात नवीन राशन दुकानाची कलापुष्प प्रतिष्ठान ने केली मागणी

शहरात नवीन राशन दुकानाची कलापुष्प प्रतिष्ठान ने केली मागणी

प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांना दिले निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 11 मध्ये नवीन राशन दुकानास मंजूरी दयावी या आशयाचे निवेदन कलापुष्प प्रतिष्ठान च्या वतीने अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले. अहमदपूर तहसील अंतर्गत शहरामध्ये 15 राशन दुकानामार्फत अन्न धान्याचा पुरवठा होतो.शहरातील एकूण राशनकार्ङ धारकांची संख्या चार हजाराहून अधिक असून त्यामुळे सध्या असलेल्या राशन दुकानावर अधिकचा ताण पङत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.व तसेच प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 11 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थोङगा रोङ परीसरातील ङाॅ उगीले साहेबांचे हाॅस्पीटलपासून महात्मा बसवेश्वर चौक ते प्रसाद गार्ङन माऊली आश्रम दोन्ही बाजूंच्या परीसरात एक ही राशन दुकान नसल्याने राशन कार्ङ धारकांना राशन आणण्यासाठी जुण्या गावात जावे लागत आहे. निवेदनावर प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी अहमदपूर नगर परिषदेचे नगरसेवक अभय मिरकले कलापुष्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव इंजी संदीप शिंगाङे यांची उपस्थिती होती.

About The Author