ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्यावतीने 18 ते 44 वयोगटासाठी दुसऱ्यांदा कोविड लसीकरण

ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्यावतीने 18 ते 44 वयोगटासाठी दुसऱ्यांदा कोविड लसीकरण

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथे वयोगट 18 ते 44 या दरम्यान ज्यांचे वय आहे अशा सर्व नागरीकांना आज कोरोनाची लस दि . 31/08/2021 रोज मंगळवारी देण्यात आली. या कार्यक्रमाला गावचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे व माजी सभापती सौ आयोध्याताई अशोकराव केंद्रे तसेच वैद्यकीय अधिकारी सांगवीकर हे उपस्थित होते तसेच सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ. ज्योति बालाजी केंद्रे सामाजिक कार्यकर्ते माधव शिवहार केंद्रे सदस्य सौं इंद्रायणीबाई केंद्रे, बाळू केंद्रे पुष्पा प्रकाश केंद्रे, मनोहर सुदाम ग्रामसेवक मोहन केंद्रे गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला यात 18 ते 44 या वयोगटात लसीकरण करण्यात आले यावेळी पहिला आणि दुसरा डोस 120 नागरीकांना देऊन लसीकरण करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!