शेणी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शेणी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती २९ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोपीनाथ जायभाये तर उपसरपंच मारुती ढाकणे, बालाजी गीते, उत्तम गुरुजी फड, वसंत केंद्रे, पांडुरंग फड, सायस फड, शिवाजी जायभाये, पंढरी बेले, राम बेले, महादू बेले, नरहरी बेले, दिगंबर बेले, भगवान पिलवटे, प्रेमनाथ फड, गजानन जायभाये, बालाजी जायभाये, निवृत्ती बेले, बालाजी वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी शिक्षिका कविता बेले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सर्वच महापुरुषांनी जाती व अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आपले जीवन झिजविले. त्यांनी मानव ही फक्त एक जात मानली आहे.समाज परिवर्तन करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करावी. जर मुलं शिकली तरच टिकतील असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार सुग्रीव बेले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण पिलवटे, शिवराज बेले, तुळशीराम बेले, दत्तात्रय बेले, ज्ञानेश्वर बेले, नामदेव दिंडे, सुर्यकांत पिलवटे, चंद्रकांत पिलवटे, क्षितिज बेले, विशाल बेले,ज्ञानेश्वर दिंडे आदींनी परीश्रम घेतले.