चांदोरीत यंदा होणार ‘एक गाव एक गणपती ; ग्रामस्थांच्या बैठकीत एकमुखी ठराव
चांदोरी ( रोहित टोंपे ) : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ग्रामस्थ व सर्व गणेशोत्सव मंडळानी यंदा ‘एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे ठरविले असुन यासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक आज गुरुवार दि 2 रोजी चांदोरी ग्रामपंचायत त संपन्न झाली.
कोरोनाविषयक शासकीय निर्बंध लक्षात घेऊन चांदोरी ग्रामपालिके मध्ये एक गाव एक गणपती उत्सव व्हावा या विषयावर ही बैठक झाली. सायखेडा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक कादरी , आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सागर गडाख पोलीस पाटील अनिल गडाख ग्रामपालिका सरपंच वैशाली चारोस्कर , उपसरपंच शिरीष गडाख सर्व सदस्य तसेच त्याच देवराम निकम, सोमनाथ कोटमे, गोकुळ टर्ले, गणेश कोटमे आदी म या बैठकीस उपस्थित होते. यावेळी यंदा सर्वानुमते एक गाव एक गणपति साजरा करण्याचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. अनेक वर्षापासून एक गाव एक गणपती उत्सव सुरु करण्यासाठी जेष्ठ नेते प्रयत्न करत होते, यंदा हया प्रयत्नांना यश आले असुन पोलिस प्रशासन व नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. चांदोरी गावाने ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने पोलीस दलावर मोठा ताण असतो. बदलत्या काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुपही बदलत आहे. काही गावांत आपसी वाद, गटतट व स्पर्धेतून वादही निर्माण होण्याची शक्यता बळावते. गणेशोत्सवादरम्यान
गावातील सामाजिक सलोखा, सद्भावना वाढीस लावणे आणि गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल ठेवण्यासाठी तसेच सद्या कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचे द्रुष्टीकोणातुन बाधा येऊ नये.या द्रुष्टीने एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासंदर्भात पोलीस व महसूल विभागातर्फे गावकऱ्यांना आवाहन करताच गोदाकाठच्या चांदोरी गावाने तात्काळ प्रतिसाद दिल्या ने ही संकल्पना प्रत्यक्षात साकारलेली आहे.चांदोरी समस्त गावकरी ,ग्रामपंचायत प्रशासन तंटामुक्त समिती व आपत्ती व्यवस्थापण समिती यांचे नासिक ग्रामिण पोलिस दल व सायखेडा पोलिस ठाणे यांचे वतीने मनपु्र्वक अभिनंदन.