कारखान्याची कोट्यवधींची फसवणूक केली ! मुरुड पोलिसांमुळे नशिबी जेलची वारी आली !!

कारखान्याची कोट्यवधींची फसवणूक केली ! मुरुड पोलिसांमुळे नशिबी जेलची वारी आली !!

मुरुड ( प्रतिनिधी ) : भारत शासनाच्या कोट्यातील काही ठराविक टक्केवारीत साखर निर्यात करून विक्री केली पाहिजे. अशा पद्धतीचा आदेश असल्यामुळे लातूर येथील विलास सहकारी साखर कारखाना निवळी यांनी सदरील अटी पूर्ण करण्यासाठी आठ हजार 364 मेट्रिक टन एवढी साखर निर्यात करण्यासाठी कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चेन्नई यांचे प्रतिनिधी अभिजित देशमुख र् रा.अहदनगर यांच्यामार्फत निर्यात करण्यासाठी रीतसर करार केला, आणि कारखान्याने अभिजित देशमुख यांना कराराप्रमाणे साखर दिली. सदरच्या कंपनीने 8 364 मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी दिली, साखर घेऊन गेल्यानंतर 90 दिवसांच्या आत या साखरेचे कागदपत्र पुरावे सादर करून अहवाल देणे बंधनकारक असताना संबंधित कंपनीने कारखाना प्रशासनाच्या वेळोवेळी केलेल्या मागणीला कोलदांडा घालून मनमानी केली. तसेच सतत कागदपत्राचे पुरावे देण्यास टाळाटाळ केली. यामुळे साखर कारखान्याचे आठ कोटी 73 लाख 87 हजार 72 रुपयांचे नुकसान झाले.

 सदर कंपनीचे कार्यकारी संचालक चंद्राबाबू प्रदीपराज, चेअरमन मदीगा मणिकांत उर्फ  मनीकृष्णा व कंपनीचे संचालक प्रदीप राज गायत्री आणि कंपनीचे प्रतिनिधी अभिजित देशमुख व सदरील कंपनीचे इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्याकडून निर्यातीची साखर कमी दरात खरेदी करून साखर निर्यात करतो असे भासवून स्थानिक बाजारात या साखरेची चढ्या भावाने विक्री करून विश्वासघात केला. आणि कारखान्याला आठ कोटी 73 लाख 87 हजार 72 रूपयांचे आर्थिक नुकसान केले. आणि फसवणूक केली. अशा मजकुराचे तक्रार विलास सहकारी साखर कारखान्याचे विधी सहाय्यक यांनी तक्रार दिल्यावरून मुरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 227/ 21 कलम 420, 406, 467, 34 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे दाखल करण्यात आला.

 सदर गुन्ह्याचा तपास लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन कुमार पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस स्टेशनचे सपोनि ढोणे यांनी तपास सुरू केला. सदर गुन्ह्याच्या तपासात नमूद पुरवण्या कुरींज प्रोनॅचुरल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चा प्रतिनिधी अभिजीत वसंतराव देशमुख यास दिनांक 1 सप्टेंबर रोजी तपास कामी मुरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात झालेली फसवणूक आणि इतर आरोपी त्याच्या अनुषंगाने अधिक तपास मुरुड पोलिस करत आहेत.

About The Author