सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भ्याड हल्ल्याचा परळी नगर परिषद कडून काळ्या फिती लावून निषेध

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भ्याड हल्ल्याचा परळी नगर परिषद कडून काळ्या फिती लावून निषेध

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : ठाणे महानगरपालिकाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज परळी नगरपरिषदेचे कार्यलयीन अधीक्षक संतोष रोडे व सुदाम नरवडे, दिलीप गुट्टे, शंकर साळवे, किरण उपाडे, विकास जगतकर, सुर्यकांत डहाळे, शेख जमिल, रमेश मुंडे, विशाल पाठक, सतिष गोखले, ज्ञानेश्वर वडाई, दिनेश पवार, ज्ञानेश्वर ढवळे, सय्यद लयीक, जूबेर सिद्दीकी, शेख आबुजर, रावसाहेब जाधव, संजय जाधव, प्रविण मोगरकर, सचिन देशमुख, सुनील आदोडे, सत्यवान रोडे शेख अकबर, मेहश मुत्तंगे, आशाताई रोडे, मिना नेहरकर, उमा व्हावळे, अंजली बांगर सर्व कर्मचारी,अधिकारी वर्गाने काळ्या फिती लावून निषेध करत कामकाज सुरु ठेवले आहे, यात सर्वांनी सहभाग आपला निषेध म्हणून नोंदवाला.

About The Author