रेन वॉटर हार्वेस्टिंग मूळे सातगाव पठारावरील गावे होणार टँकर मुक्त

रेन वॉटर हार्वेस्टिंग मूळे सातगाव पठारावरील गावे होणार टँकर मुक्त

पुणे (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील गावात उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून वसुंधरा संवर्धन, द कॅलिमेट रिऍलिटी, मॅप्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आय सी आय सी आय बँकेच्या मदतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पामुळे लाखो लिटर पाणी भुजलात साठवले जाणार आहे व भुजलातील पाणी पातळी वाढणार आहे.

या प्रकलपाच्या अंतर्गत भावडी मध्ये ५५ घरे, कारेगाव मध्ये ३५ घरासहित सर्व सरकारी कार्यालये, शाळा, मंदिरे यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम करण्यात आली आहेत. सप्टेंबर अखेर पर्यंत कुरवंडी व थुगाव मध्येही हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी भावडीतील शाळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. कर्नल शशिकांत दळवी यांनी त्यांना त्यांच्या शाळेवर लागू केलेली  (रेन वॉटर हरेव्हस्टिंग )आरडब्ल्यूएच प्रणाली समजावून सांगितली. शाळेच्या 5000 चौरस फुटांच्या छतावर पावसाळ्यात पडणाऱ्या पान्यामुळे वर्षाला 4 लाख लिटरपेक्षा जास्त पावसाचे पाणी साठणार असल्याचे सांगितले.

कर्नल दळवी यांनी त्यांना आश्वासन दिला की, एका पावसाळ्यानंतर त्यांची शाळा बोअरवेल, त्यांना वर्षभर पाणी पुरवेल.

तसेच कायमस्वरूपी सर्व गावकऱ्यांना पाण्याची उपलब्धता सुधारण्यासाठी जलसंधारण सराव, विद्यार्थ्यांनी गावातील नदीची स्वच्छता करणे आवश्यक आहे. याचे महत्त्व पटवून दिले.

मुख्याध्यापक श्री राजगुरू यांनी गावचे सुपुत्र केशव नवले यांच्या माध्यमातून कर्नल दळवी आणि श्री अनिरुद्ध तोडकर यांचे सातगाव पठारावरील गावात असे महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविल्याबद्दल आभार मानले. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी प्रणालीच्या देखभालीचे आश्वासन दिले आणि पालक-शिक्षक संमेलनादरम्यान पालकांमध्ये प्रणालीबद्दल जागरूकता पसरवली.

या कार्यक्रमाला वसुंधरा संवर्धन सदस्य, पत्रकार श्री केशव नवले आणि  वरिष्ठ वार्ताहर श्रीकृष्ण काळे, पश्चिम महाराष्ट्र गाव पोलीस पाटील संघटनेचे श्री गोरक्षनाथ नवले पाटील उपस्थित होते.

About The Author