लातूर परिमंडळ आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथील महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटन परिमंडळ लातूर यांच्या वतीने आढावा बैठक व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.आयु नवनाथजी पोटभरे साहेब केंद्रीय उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली लातूर परिमंडळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे,अधिवेशन सहयोग निधी व जाहिरात निधी जमा करणे, दि 9 आक्टोबर 21 रोजी औरंगाबाद येथे संघटनेचे अधिवेशनाची तयारी करणे या सर्व विषयावर चर्चा झाली. यावेळी सत्यप्रकाश कांबळे मंडळ सचिव लातूर,मुजमील शेख सचिव मंडळ बीड यांनी संघटनेचे चालू असलेले कार्य व अहवाल थोडक्यात विषद करुन व लवकरच अधिवेशन निधी व जाहिरात निधी जमा करण्यात येईल असे सांगितले.
सुंदर लटपटे मुख्य अभियंता साहेब लातूर परिमंडळ कार्यालयात रुजू झाल्यामुळे त्यांचा संघटनेच्या वतीने भारतीय संविधान हा ग्रंथ व विशेष पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी आर एस गायकवाड अध्यक्ष परिमंडळ लातूर, सिद्धार्थ कुसभागे सचिव परिमंडळ लातूर, बालाजी कांबळे कार्याध्यक्ष परिमंडळ लातूर, कल्याण मस्के अध्यक्ष बीड यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच संघटनेचे अशोक ढवळे, संजय जाधव, राजीव हरगीले, सिद्धार्थ कांबळे, अहेमद शेख ईत्यादी सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.