बी एस एफ जवान बलभीम कांबळे यांचे आकस्मीत निधन

बी एस एफ जवान बलभीम कांबळे यांचे आकस्मीत निधन

सुटीवरून गावाकडे येत असताना दिल्ली रेल्वेस्थानकात ह्रदयविकाराचा झटका

किनगांव (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील बीएसएफ जवान बलभीम रंगनाथ कांबळे हे पाक सिमा बाॅर्डरवर गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते.सुट्टी घेऊन ते गावाकडे येत होते.मात्र दिल्ली रेल्वे स्थानकावर आल्या नंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मीत निधन शनिवार दि 9 जानेवारी झाले. जोधपूर येथे ट्रेनिंग करून गंगानगर येथील पाक बाॅर्डरवर बि एस एफ जवान बलभीम रंगनाथ कांबळे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते.शनिवारी रात्री ते आपल्या गावी सुट्टीवर येत होते.दिल्ली रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला व रूग्णालयात नेईपर्यंत त्यांचे निधन झाले.प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद शाळा कोपरा येथे झाले व माध्यमिक शिक्षण नुतन जनता विद्यालय सोनखेड (मानखेड)येथे झाले.अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांची वर्ष 2000 मध्ये बाॅर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये निवड झाली होती.गेली अठरा वर्षे देशाच्या विविध भागांमध्ये त्यांनी सेवा केली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोपरा व परिसरातील गावावर आणि अहमदपूर- चाकूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपंच गंगाधर देपे उपसरपंच प्रा बालाजी आचार्य यांनी शोक व्यक्त केला आणि अत्यं विधीसाठी स्मशानभूमीत पूर्ण तयारी करून जवानाचे शवं कधी येई यांची आई- वडील, पत्नी मुलगा, मुली,नातेवाईक गावकरी दुःखी अंतकरणाने वाट पाहत आहेत चाकूर येथील बिएसएफ येथील अधिकाऱ्यांनी , आणि जवान उत्तम कांबळे यांनी ,जवान बलभीम कांबळे यांच्या निधनाची वार्ता दिली आणि शवं आणण्यासाठी सवोपत्तरी दिल्लीतील अधिकाऱ्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जवान बलभीम कांबळे हे कुटूंबातील प्रमुख होते त्यांच्या पश्चात आई- वडील,पत्नी, भाऊ,एक मुलगा, दोन मुली,असा परिवार आहे. कोपरा येथील अनेक तरूण पोलिस व लष्करात भरती झालेले आहेत.सिमेवर जाऊन देशाचे रक्षण करतात त्यातीलच एक जवान बलभीम रंगनाथ कांबळे हे पाक सिमेवरून काही सुट्या मिळालेल्या असल्याने आपल्या कुटुंबियां सोबत घालवण्यासाठी कोपरा गावाकडे निघालेले होते जवान बलभीम वर काळाने घाला घातला.कोपरा गावकऱ्यांवर अश्रू, व दुःखाचे सावट पसरले आहे.

गंगानगर राज्यस्थान येथून दिल्ली मार्गे गावाकडे येत असताना दिल्ली रेल्वेस्थानकात जवान बलभीम रंगनाथ कांबळे यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला त्यात त्यांचे आकस्मीत निधन झाले. या संबंधीची माहिती बीएसएफ कार्यालय , चाकूर आणि किनगांव पोलीसांनी दिली आहे स्थानिक प्रशासन बिएसएफच्या संपर्कात असल्याचे अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले आहे.कोपरा गांव देशाच्या सिमेवर राष्ट्रसेवा करणाऱ्या जवानाच्या अतिम दर्शन आणि संस्काराच्या प्रतिक्षेत असून गावात चूल पेटली नाही दुःखी अतं करणाने सानुश्रु गाळात आहे.

About The Author