लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

0
लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

उदगीर(प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी व प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,हा विचार कृतीतून सिद्ध केला.त्यांनी सर्व जाती-धर्मातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देऊन सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी केली.शाहू महाराजांनी समता,बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला.त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.त्यांच्या कार्यामुळे अनेकांना शिक्षण, स्वाभिमान आणि प्रगतीची संधी मिळाली.असे मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अध्यक्षीय समारोपपर भाषण राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारातून सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षण,सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ आहे.
प्रिय विद्यार्थ्यांनो,तुम्हीच उद्याचे जबाबदार नागरिक आहात.शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नियमित अभ्यास करा,चांगले संस्कार अंगीकारा,सर्वांशी प्रेमाने वागा आणि कोणताही भेदभाव न करता समानतेची भावना जपा. ज्ञान,शिस्त,प्रामाणिकपणा आणि समाजसेवा हीच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपल्या जीवनात उतरवून एक सुसंस्कृत,समतावादी आणि प्रगत समाज घडविण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया.असे आवाहन केले. सुत्रसंचलन,प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सौ.सुनेजा मठपती यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!