अवैध दारू व्यवसायावर मुरूड पोलिसांची कारवाई .1 लाख 34 हजार रुपयांचा देशी दारूसाठा व कार जप्त, दोन आरोपींना अटक.

0
अवैध दारू व्यवसायावर मुरूड पोलिसांची कारवाई .1 लाख 34 हजार रुपयांचा देशी दारूसाठा व कार जप्त, दोन आरोपींना अटक.

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील अवैध दारूची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत मुरूड पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ व नियोजनबद्ध कारवाई करून 1 लाख 34 हजार रुपयांचा अवैध देशी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.
दि. 26 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 9.20 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलिसांना अंकोली परिसरात एका कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित मारुती सुझुकी आल्टो (क्र. MH-24 C-7954) या वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये 90 एमएलच्या ‘सिमला संत्रा’ व ‘टँगो पंच’ कंपनीच्या एकूण 1,600 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत 64 हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 70 हजार रुपये किमतीच्या कारसह एकूण 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत महेश लक्ष्मण गायकवाड (वय 24, व्यवसाय – चालक, रा. खंडापूर, ता. जि. लातूर), महादेव शंकर गायकवाड (वय 42, व्यवसाय मजुरी, रा. खंडापूर, ता. जि. लातूर)
यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपी कोणताही वैध परवाना न घेता आर्थिक फायद्याच्या उद्देशाने अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक व विक्री करण्यासाठी हा साठा घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन मुरूड येथे गुन्हा क्रमांक 195/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ)(ई), 81 व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामदास बलभीम नाडे यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंधारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रामदास नाडे, सहायक फौजदार दशरथ गिरी, रामचंद्र जाधव, पोलीस अमलदार हणमंत माने, कोळी यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस अमलदार माने हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!