अहमदपूर पोलीस स्टेशन येथे पोलिस पाटलांची शांतता बैठक

अहमदपूर पोलीस स्टेशन येथे पोलिस पाटलांची शांतता बैठक

अहमदपूर (गोविंद काळे) : गणेशोत्सव व पोळा सणानिमित्त उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक ३ सप्टेंबर रोजी पार पडली. बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजीले म्हणाले की, कोरोना कमी झाला आहे परंतु संपुष्टात आला नाही. सणवार साजरे करताना आरोग्यास कोणताही धोका होणार नाही याची काळजी आपापल्या गावात पोलिस पाटलांनी घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव व पोळा हे अत्यंत साधेपणाने साजरा करावा. पारंपरिक, आरोग्य सेवा अशा समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे, सार्वजनिक मिरवणूक नसावी, श्री गणेशाची मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक उंचीची नसावी. सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा, लोकांची गर्दी होईल असे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, शक्यतो एक गाव एक गणपती असावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पोलिस पाटील यांनी प्रयत्न करावेत.जनतेने सण साजरा करताना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत. या वेळी पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, आलापुरे यांची उपस्थिती होती

About The Author

error: Content is protected !!