कापूस पिकाची शेतीशाळा कृषी विभागाकडून संपन्न
उजना (गोविंद काळे) : अहमदपुर तालुक्यातील शिऺदगी बु येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कापुस पिकाची शेतीशाळा कृषी विभागाकडून घेण्यात आली सदर शेतीशाळेत शेतकर्याने कापुस पिकावरील येणार्या गुलाबी बोंड अळी व्यवस्थापणासाठी व बोंड अळीची आर्थीक नुकसान पातळी तपासण्यासाठी कामगऺध सापळ्याचा वापर कसा करावा या बाबत मार्गदर्शन करून सापळ्याचे वाटप करण्यात आले व पक्षी थाऺबे,पीवळे चिकट सापळे या बाबत माहीती देण्यात आली तसेच बोंड अळीच्या व कापसावरील रस शोषन करणार्या किडीची माहीती देउन व्यवस्थापणा बाबत माहीती देण्यात आली शेतकर्यानी कापुस पिकाची निरीक्षणे घेऊन चित्रीकरण व सादरीकरण केले साऺघीक खेळ घेउन शेतीशाळेची साऺगता करण्यात आली सदर शेतीशाळेत प्रशिक्षण प्रवर्तक तथा कृषी साहायक श्री आर. जी. नाईक याऺनी मार्गदर्शन केले तर गोविंद थावरे व शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख बाळासाहेब विठ्ठलराव पडीले यानी आभार मानले व शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यानी शेतकरी राजाला सरकार मार्फत जे जे काही अनुदाना मार्फत अवजारे भेटतात ते ते शेतकरी राजाला देण्यात यावे अशा पण सूचना तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.