यशवंत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

यशवंत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयांमध्ये 5 सप्टेंबर अर्थात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करून ते म्हणाले की शिक्ष कानी जीवनभर चंदनाप्रमाणे शिजून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य करावे असे सांगितले. यावेळी शिक्षकांच्या वतीने श्रीमती वर्षा माळी सहशिक्षक गहिनीनाथ सिरसागर महाराज, लक्ष्मण फड, यांचे मनोगत पर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार अरुण मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!