संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 5 सप्टेंबर अर्थात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.यावेळी आज पालकच शिक्षक झाले आणि ऑनलाईन अध्यापन करत एक दिवस शाळा चालवली. पालकच खरे पहिले गुरू (शिक्षक) असतात. म्हणून हा स्तूत्य उपक्रम राबवून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.पालक शिक्षक ऑनलाइन उपक्रमामध्ये धनंजय पाटील ,स्वप्ना भालके, प्रियंका कांबळे, सरस्वती देवकते , जयपदम वजीर सर यांनी प्रत्यक्ष ऑनलाइन तासिका घेवून या उपक्रमात मध्ये सहभाग घेतला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था अध्यक्ष मा. श्री गणेश दादा हाके- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांचा मा. गणेश दादा हाके पाटील यांच्या हस्ते शाल ,पुष्पहार,व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षकांच्या वतीने मीना तोवर मॅडम, राज्य आदर्श शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशाताई रोडगे यांनी केले, सूत्रसंचालन नंदकुमार मद्देवाड यांनी तर आभार सतीश साबणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!