मारवाडी समाजास स्मशान भूमि साठी जागा उपलब्ध, राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन
उदगीर : उदगीर येथील मारवाडी समाजाच्या स्मशान भूमी चा प्रश्न प्रलंबित होता,राज्यमंत्री यांच्या अथक परिश्रमाने प्रशासकीय अधिकारी यानी 5 गुण्टे जागा स्मशान भूमि साठी मंजूर केल्याने त्यांचे सर्व समाजानी धन्यवाद देऊन अभिनंदन केले आहे
उदगीर येथील मारवाडी समाजाच्या स्मशान भूमि चा प्रश्न अनेक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित होता,या बद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे यानी विशेष लक्ष घालून वेळो वेळी प्रशासकीय अधिकारी याना योग्य त्या सूचना देऊन सदरिल स्मशान भूमि चा प्रश्न मार्गी लावला असून स्मशान भूमि साठी तोंडार पाटी येथील 5 गुण्टे जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे व प्रशासकीय अधिकारी यांचे उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे मार्गदर्शक डॉ रामप्रसाद लखोटिया,ईश्वरप्रसाद बाहेती,अध्यक्ष विनोदकुमार टवानी सचिव श्रीनिवास सोनी,अमोल बाहेती,रामबिलास नावंदर,डॉ प्रवीण मूंदड़ा,शिरीष नावंदर,लक्ष्मीनारायण लोया, गोविंदलाल राठी,कैलाश बियानी,राजेश पारिख,सुभाष पालीवाल,बाबूलाल कालाणी, द्वारकादास भूतड़ा,राजू ईनाणी, संजयकुमार सोनी,कोमल मालपानी,जगदीश बागड़ी,आनंद बजाज,प्रदीप बियानी, गणेश बजाज,राजेश सारडा,कैलाश मालू,डॉ. भीकमचंद सोनी,श्याम सारडा,देवीदास बजाज यानी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.