समाजसेवेचे अवघड काम रोटरीकडून निष्ठेने चालू – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांचे प्रतिपादन

समाजसेवेचे अवघड काम रोटरीकडून निष्ठेने चालू - ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांचे प्रतिपादन

उदगीर (अँड.एल.पी.उगीले) : आजच्या काळात सामाजिक भान ठेवून काम करणे हे खूप कठीण काम आहे, मात्र हेच काम रोटरी परिवाराकडून निष्ठेने चालू असल्याचे मत ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात  रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या २०२१-२२ च्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, सहा. प्रांतपाल रो. अनिल चवळे, ॲड. सविता मोतीपवळे, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष रो. प्रमोद शेटकार, सचिव रो. रविंद्र हसरगुंडे, अपेक्षा शेटकार, रोहिणी हसरगुंडे, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोट. सचिन पेन्सलवार, सचिव रोट. अभिजीत विश्वनाथे उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी, संत तुकारामांनी सांगितलेल्या जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा. या उक्ती प्रमाणे रोटरी क्लब काम करीत आहे. या क्लबचा आर्थिक व्यवहार हा अतिशय पारदर्शक असल्याचे गौरवोद्गारही यावेळी त्यांनी काढले. रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगत रोटरी परिवार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करीत असताना याठिकाणी रक्ताच्या पलीकडचे नाते निर्माण होते, असे सांगीतले. रोटरी हीच जात आणि सेवा हाच धर्म मानून रोटरी कार्य करीत असते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे मावळते अध्यक्ष रो. विशाल तोंडचिरकर यांनी केले. रोटरीच्या मावळत्या सचिव रो. कीर्ती कांबळे व रोटरॅक्टचे मावळते सचिव अमोल पोलावार यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला. रोटरीचे नुतन अध्यक्ष रो. प्रमोद शेटकार व रोटरॅक्टचे सचिव अभिजीत विश्वनाथे यांनी आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी महाराजांच्या हस्ते राजकुमार शिवशिवे, नामदेव चोले, छाया कुटेमाटे, महादेव विश्वनाथे, सुनंदा सरदार आदी शिक्षकांना राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.  कु. श्रेया शेटकार हिने गणेश वंदनांने पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन रो. विशाल जैन व रो. मंगला विश्वनाथे यांनी केले. तर आभार सचिव रो. रविंद्र हसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते रमेश आंबरखाने, मोतीलाल डोईजोडे, ॲड. एस. टी. पाटील, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लक्ष्मीकांत सोनी, नंदकिशोर लोया, सोनू डगवाले, विजयकुमार बिरादार, शिवाजी पाटील सह शहरातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

About The Author