राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचा सत्कार संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचा सत्कार संपन्न

उदगीर : लातूर जिल्ह्यात नामांकित असलेले किसान शिक्षण प्रसारक मंडळाने बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन अनेक तपापासून शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे. किसान शिक्षण प्रसारक मंडळाची नवनियुक्त कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारणीत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुकाध्यक्ष व पंचायत समिती उदगीरचे सभापती प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. अजित पाटील तोंडचिरकर, महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर जिल्हा सचिव श्री. पृथ्वीराज पाटील एकंबेकर व युवा नेते श्री. विशाल पाटील शिरोळकर आदी मान्यवरांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल उदगीरच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा निरीक्षक नवनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली फेटा, शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन पंचायत समिती उदगीर येथे जाहीर सत्कार करण्यात आला.  

        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उदगीरचे शहराध्यक्ष शेख समीर, शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, शहर उपाध्यक्ष शंकर मुक्कावार, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व्यंकटराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर केंद्रे, संस्थाचालक सुभाष बिराजदार, पंचायत समिती सदस्य नरसिंग जाधव, विदेश पाटील, मनोज गोंदेगावे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे, युवक विधानसभा उपाध्यक्ष सतीश गायकवाड, युवक उदगीर तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष शफिक हाश्मी, तालुकाध्यक्ष आजहर मोमीन,  सामाजिक न्याय विभाग उदगीर तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, ता. कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, जिल्हा सरचिटणीस नामदेव भोसले, अरविंद गिलचे, दिलीप मटके, राहुल सोनवणे, विजय भालेराव, रोफ थोडगे, जानापूरचे माजी सरपंच महादेव चीमेगावे, विजय एन टीचे उदगीर तालुकाध्यक्ष शिवा निलंगे, डॉक्टर सेलचे उदगीर शहराध्यक्ष डॉ. विक्रम माने, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. सत्यकला गायकवाड, महिला तालुकाध्यक्ष सौ. उर्मिला वाघमारे, महिला शहराध्यक्ष सौ. दिपाली आवटे, युवती जिल्हा सरचिटणीस सुष्मिता माने, युवती शहराध्यक्ष सौ. ज्योती स्वामी, लीलावती काळगापुरे, जिलेबाबी शेख, अनिता पांचाळ, ज्योती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.  

     सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे लातूर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांनी मानले.   

    या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचंद्र  गायकवाड, संतोष जाधव, तुळशीदास वाघमारे, प्रशांत कांबळे, दयानंद पाटील, मनीष मुळे, गिरीष स्वामी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!