माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्याहस्ते स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्याहस्ते स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईअंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षा 2021 मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी उज्ज्वल यश संपादन केलेले आहे. या परीक्षेमध्ये सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचा एकूण निकाल 100% लागलेला आहे.तर कॉम्पुटर इंजिनीरिंगच्या राठोड दीपकने 93.49% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा संस्थेच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रणजितभैया पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शिक्षण संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव, अप्पासाहेब पाटील, इस्टेट मॅनेजर,चंद्रशेखर पाटील, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक संजय बिराजदार, उपप्राचार्य मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यामध्ये सिव्हील विभागात गहेरवार ओमसिंह 92% गुण घेवून प्रथम, भातलवंडे दिग्विजय 91.42% द्वितीय तर माने अजय 91.11% गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. मेकॅनिकल इंजिनीरिंगमधून उद्धव संपते 92. 87 % प्रथम, साहिल पवार 88. 46% द्वितीय आणि निशिकांत क्षीरसागर 86.92 % तृतीय क्रमाकाने उर्त्तीण झालेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगमधून अजित भस्मारे 87% गुण घेवून प्रथम, सारिका वाडीकर 86.05 % गुण घेवून द्वितीय, जाधव वसुधा 85% गुण घेवून तृतीय आलेली आहे. तर कॉम्पुटर इंजिनीरिंगमध्ये दीपक राठोड 93.49% प्रथम, अक्षता कुंभेजकर 89.61% द्वितीय , दिपक आवाड 88.97% गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन इंजिनीरिंगमधून सय्यद शिफा 92% प्रथम, पुजारी निखील 87 % द्वितीय आणि बिबराळे प्रतिमा, 86% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचार्‍यांतून कौतुक केले जात आहे.

About The Author