अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसानभरपाई द्या
मनसेचे अहमदपूर तहसीलदारांना निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील व परिसरातील अनेक गावांमध्ये गेली पाच दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्या या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर तहसीलदारांना देण्यात आले.अतिवृष्टीमुळे हातातोंडाला आलेले सोयाबीन,कापूस,तूर,ज्वारी आदी खरिपाची पिके मोठ्याप्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत.ऊस शेतात आडवा पडल्यामुळे उसशेतिलाही मोठा फटका बसला आहे.तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व जिथे क्षेत्र मोठे आहे तिथे तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी कारण शेतकरी होतीनव्हती तेवढी पुंजी पिकावर लावून बसला होता व अचानक निसर्गाने सारेच हिरावले आहे. सत्ताधाऱ्यांनो शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही. डॉ नरसिंह भिकाणे. आजच्यापरिस्थितीत मायबाप शासन प्रशासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देने अत्यावश्यक आहे. असे असतानाही जर शासन बघ्याची भूमिका घेणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ताधारी नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी दिला आहे)यावेळी शहराध्यक्ष अतिष गायकवाड, दयानंद बंडे, भुजंग उगिले, मारोती गायकवाड, बालाजी यादव, सुभाष कांबळे, माधव गायकवाड,कार्तिक भिकाने, बालाजी देशमुख,योगेश गोरटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.