कॉक्सिट’ ला नॅकचे बी प्लस मानांकन जाहीर

कॉक्सिट’ ला नॅकचे बी प्लस मानांकन जाहीर

लातूर (प्रतीनिधी) : संगणकशास्त्रातील अग्रेसर महाविद्यालय म्हणून सर्व परिचित असलेल्या येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाला (कॉक्सिट) नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यांकनात बी प्लस मानांकन मिळाले आहे. याबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मूल्यमापन परिषद (नॅक) यांच्यामार्फत 1000 गुंणांच्या मापनपद्धतीतील, संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट) चे 670 गुणांचे मुल्यांकन नॅकद्वारेच आऊटसोर्सींग करुन थर्ड पार्टीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, व उर्वरीत 330 गुणांच्या मुल्यांकनासाठी नॅकतर्फे तीन तज्ज्ञांच्या टीमने येथे समक्ष येवून मूल्यांकन केले. यात कोइंबतूर येथील डॉ. के. मुर्गन, बंगळुरू येथील डॉ. निरंजन राज व दिल्ली येथील डॉ. महम्मद अल्ताफ खान यांचा समावेश होता. या टीमने कॉक्सिटमधील सर्व सुविधांची पाहणी केली, त्यांनी महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, अत्याधुनिक साधनांचा पुरेपूर वापर, व्यायामशाळा, सौर ऊर्जा प्रकल्प, सुसज्ज संगणकशास्त्र प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, ऑनलाइन शिकवणी पध्दत या बाबींची पाहणी केली. महाविद्यालयाच्यावतीने सुरू असलेल्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे विशेष कौतुक केले. महाविद्यालयातील सर्व बाबींची पाहणी करून गेल्यानंतर या टीमने त्यांच्या अहवाल नॅक कार्यालयास जमा केला असता दोन्ही स्तरावर महाविद्यालयास मिळालेल्या गुणांनुसार महाविद्यालयाला बी प्लस मानांकन नॅकद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे. यापूर्वी महाविद्यालयास सी.जी.पी.ए. 2.58 (63.5%) बी मानांकन प्राप्त होते. त्यात आता वाढ होवून नवीन मुल्यमापन प्रणालीनुसार सी.जी.पी.ए. 2.68 (67%) बी. प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयाच्या मानांकनात वाढ झाल्याबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. कैलास जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्रा. डी. आर. सोमवंशी, विभाग प्रमुख डी. एच. महामुनी, प्रा. आय. ए. पाटील, प्रा. एस. व्ही. देशमुख, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तानाजी खरबड, कार्यालय अधिक्षक अधीक्षक संतोष कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!