शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज लि. मोहा येथे द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन
कळंब (सागर वीर) : येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज लि. मोहा येथे द्वितीय_बॉयलर अग्नी प्रदीपन व दहावी – बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवसेना खासदार मा. श्री.ओमप्रकाश निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते. चेअरमन श्री हणमंततात्या मडके साहेबांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ग्रामीण भागातील मराठी माणूस पुढे जात नाही ही परंपरा मोडीत काढून नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी हणमंत तात्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी कुटुंब यांना केंद्रबिंदू माणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी नांदली पाहिजे यासाठी हणमंत तात्यांनी आपले कार्य अविरत आणि अखंडितपणे सुरू ठेवले तर आपला जिल्हा सुद्धा सुजलाम् सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या भागाचा आणि जिल्ह्याचा सर्वांगाने विकास करण्यासाठी आणि विविध कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सर्व कटिबध्द असल्याचा शब्द मा.खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिला.
याप्रसंगी श्री.अशोक मोहेकर, शिवसेना नेते श्री.प्रशांत (बाबा) चेडे, माजी ते.स.सा.का.संचालक श्री उद्धव आण्णा समुद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री शिवाजी (आप्पा) कापसे, श्री दिलीप बापू धोत्रे, श्री.हणमंत मडके, माजी सरपंच श्री बाबा मडके, उपसरपंच श्री सोमनाथ मडके, ढोकी उपसरपंच श्री. पापा समुद्रे, श्री दिलीप पाटील, पं. स.सदस्य श्री प्रशांत घोंगडे, सरपंच श्री. राजू झोरी, दहिफळचे सरपंच श्री. चरण पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स.सा.का.चेअरमन श्री.अरविंदजी शिंदे, श्री.प्रा.पवार सर, श्री बापूराव शेळके, श्री.आनंदशेठ बलाई, श्री. धनंजयकाका मडके, माजी सरपंच श्री तुळशीदास जमाले, श्री.अमर समुद्रे, श्री.समदभाई शेख, माजी सरपंच श्री बाबा तवले, श्री कापसे सर, श्री. फत्तेसिंह बावणे, श्री.सगरे साहेब यांच्यासह गावातील आणि पंचकृषीतील नागरिक उपस्थित होते.